जलनेती (Jalneti)
जलनेती
जलनेती ही आयुर्वेदाऐवजी योगशास्त्रात सांगितलेली एक क्रिया आहे, असं म्हणणं अधिक योग्य ठरेल.
योगशास्त्रात सहा क्रिया (षट्क्रिया) सांगितलेल्या आहेत. नेती त्यापैकी एक.
आता तांत्रिक माहिती (technical details) बाजूला ठेवून थेट जलनेतीबद्दलच बोलू.
जलनेती म्हणजे एका नाकपुडीतून पाणी आत सोडायचं आणि दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर येऊ द्यायचं.
चित्रात बघितलं तर हा प्रकार फार भयंकर वाटतो. पण प्रत्यक्षात तेवढा अवघड नाहीय!
जलनेती का करायची?
आपल्या नाकाच्या मागे, गालांच्या हाडामागे, कपाळाजवळ अनेक खोबणी/पोकळ्या असतात. त्यांना सायनसेस (sinuses) म्हणतात.
आपण श्वास घेतो तेव्हा अनेक प्रकारचे जीवाणू, विषाणू, बुरश्या, ॲलर्जी निर्माण करणारे पदार्थ नाकाच्या मागच्या पोकळीमध्ये चिकटून बसतात. मग त्यातूनच आपल्याला सर्दीपडसं, ॲलर्जी, सायनसचा त्रास (sinusitis), श्वसनाचे आजार, कान-नाक-घशाचे संसर्ग वगैरे विकार होतात. अगदी कोरोनाचा विषाणूसुध्दा त्याच मार्गाने शरीरात शिरतो!
जलनेती करताना आपण थोडंसं मीठ घातलेलं कोमट पाणी एका नाकपुडीत आत सोडतो. ते पाणी दोन नाकपुड्यांच्या मागच्या पोकळीतून वाहात जाऊन दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर पडतं.
आपल्या नाकात, विशेषतः नाकाच्या मागच्या पोकळ्यांमध्ये बऱ्याचदा चिकट स्राव (म्हणजे शेंबूड!) गच्च साठून राहिलेला असतो. हे पाणी दोन्ही नाकपुड्या आणि त्यांच्या मागची पोकळी स्वच्छ धुवून काढतं. त्यामुळे नाक तर मोकळं होतंच पण त्याच्याबरोबर हे चिकटलेले सूक्ष्मजीव आणि ॲलर्जेन्ससुध्दा धुतले जातात!
अर्थात अगदी जादू होऊन सगळे जीवाणू, विषाणू धुतले जातात असं मुळीच नाही. पण त्यांची संख्या कमी होते, त्यामुळे इन्फेक्शनची शक्यताही कमी होते.
माझा अनुभव काय आहे?
मला ॲलर्जी, सर्दी, खोकला, गालाच्या बाजूची सायनस (maxillary sinus) सुजून दुखणं वगैरे त्रास सतत होत असतो. पण जलनेती सुरू केल्यापासून दोन आठवड्यातच त्यांचं प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झालंय. विशेषतः, सायनसचा त्रास खूपच कमी झालाय.
जलनेती करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?
तसं पंधरा वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या माणसाने जलनेती करणं फारसं धोकादायक नाही. पण तरीही रक्तदाब, हृदयविकार, काही गंभीर आजार, नाकाचं हाड वाढलेलं असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
दुसरं म्हणजे तुम्ही यापूर्वी प्राणायाम शिकला असाल आणि तुम्हाला कपालभाती येत असेल तर फारच उत्तम. कारण नुसतं वाचून किंवा व्हीडिओ बघून प्राणायाम करण्यापेक्षा गुरूकडून/इन्स्ट्रक्टरकडून शिकणं कधीही सुरक्षित.
तरीही YouTubeवर जलनेती कशी करायची याचे अनेक उत्तम व्हीडिओज आहेत. ते बघून, जरा काळजी घेऊन तुम्ही 'प्रयोग' करू शकता! खाली एक लिंक दिली आहे ती तुम्ही बघु शकता.
जलनेती कशाने करायची?
जलनेती करण्यासाठी एक भांडं मिळतं. त्यांचं खरं नाव 'नेतीपात्र', पण लोक त्याला 'नेती पॉट' म्हणतात. प्लॅस्टिक, सिरॅमिक, स्टील वगैरे अनेक प्रकारची नेती पॉट्स् मिळतात. परंतु असे नेती पाॅट चा वापर करुन जलनेती करणं क्लिष्ठ असतं. त्यासाठीच ''आयुर्टेक बायोहॅकर्झ प्रायवेट लिमिटेड'' ह्या कंपनीने जलनेतीसाठी एक Advanced, Automatic , बाॅल पेन बटण क्लिकची बाॅटल बनवली आहे. लहांनापासुन मोठ्यांपर्यंत सर्वांना वापरायला सोपी आहे. त्यामुळे तिचा वापर करावा.ती तुम्हाला www.jalnetishop.com ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
जलनेतीची पूर्वतयारी
आधी जलनेती बाॅटल स्वच्छ धुवून घ्यावं. जमलं तर उकळत्या पाण्यात 'स्टरिलाइझ' केलत तर अधिक चांगलं. आयुर्टेक जलनेती बाॅटल गरम पाण्यात उकळली तरी चालते.
मग हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावेत.
एका भांड्यात पिण्याचं गरम पाणी घ्यावं. त्याच्यात बोट बुडवून बघावं. पाणी गरम असावं, पण सुसह्य असावं. चटका बसायला नको. नाकाची आतली त्वचा नाजूक असते!
आता या गरम पाण्यात थोडं मीठ घालून त्याची चव बघायची! साधारणपणे आपल्या अश्रूंइतका खारटपणा असावा.
आता हे पाणी नेतीपात्रात भरलं की तुमची तयारी पूर्ण!त्यासाठी तुम्ही आयुर्टेक जलनेती साॅल्टचे रेडीमेड पाऊच वापरु शकता. 300 मिली बाॅटलमध्ये 3 ग्रँमचा सॅचेट आणि 500 मिलिच्या बाॅटल मध्ये 5 ग्रँमचे सॅचेट टाकु शकता. तुमच काम त्याने अतिशय सोपं होत.
जलनेती कशी करायची?
जलनेती करण्यापूर्वी एकदा कपालभाती करावी. ते येत नसेल तर हलकसं नाक शिंकरून मोकळं करावं.
थोडसं वाकुन , डोक तिरक करुन तोंडाने श्वास घ्यायची प्रॅक्टिस करावी. किंवा नाकपुड्या बोटांनी बंद करुन फक्त तोंडाने श्वास घ्यायची प्रॅक्टिस करावी. आणी नंतर जलनेती सुरु करावी.
पाणी भरलेल्या जलनेती बाॅटलचा नेजल नाॅब (spout) एका नाकपुडीला लावायचं, स्वतःचं तोंड मात्र (श्वास घेण्यासाठी) उघडंच ठेवायचं, मान हळूहळू एका बाजूला झुकवत न्यायची. नंतर एकदा बटण दाबावे आणि एका क्षणी तुमच्या दुसऱ्या नाकपुडीतून पाण्याची धार सुरू होईल!
कदाचित क्षणभर चुरचुरेल, क्वचित प्रसंगी एखादा ठसका लागून पोहायला शिकताना आलेला अनुभव पुन्हा मिळेल! पण लगेच थांबवायचं, नाक थोडंसं शिंकरायचं आणि पुन्हा सुरुवात करायची. परंतु तुम्ही जर आयुर्टेक जलनेती साॅल्ट वापरल तर तुम्हाला 0% इरिटेशन जाणवेल. कारण त्यात साध्या मिठाऎवजी हिमालयन पिंक साॅल्ट वापरलय. आणी सोडीअम बायकार्बोनेट आणी झायलिटाॅलमुळे जलनेती खुप चांगल्या पध्दतीने होते. ती सुध्दा चुरचुरल्या विना.
मान वाकडी करताना डोकं पुढे झुकणार नाही याची काळजी घ्यायची, नाहीतर कपाळातल्या सायनसमध्ये पाणी जाईल. तसं वाटलं तर लगेच थांबवायचं आणि पुन्हा सुरू करायचं.
मानेचा योग्य कोन 'सापडण्यासाठी' कदाचित थोडा वेळ लागेल. पण एकदा का ते जमलं की आख्खी जलनेती बाॅटल अर्ध्या मिनिटात रिकामं कराल!
कधीकधी जाणवेल की एका नाकपुडीतून पाणी जाणं सोपं आहे, पण दुसरीतून नीट जात नाहीत. हळूहळू तो कोनसुध्दा सापडेल.
क्वचित प्रसंगी पाणी पोटात जाईल. पण फार काही बिघडत नाही. नाहीतरी प्यायचंच पाणी घेतलं होतं, आणि नाकातले पदार्थ आपल्याच शरीरात तयार झाले होते! 😀
आता जलनेती का शिकणं गरजेच आहे ते सांगतो…
सध्याच्या कोरोनाच्या निमित्ताने पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे वैद्यकीय प्रमुख डॉ. धनंजय केळकर यांनी काही संशोधन केलंय.
त्यांच्या मते नियमित व्यायाम केला, 'ड' जीवनसत्त्व घेतलं आणि रोज दोनदा जलनेती केली तर कोरोनाव्हायरसचं इन्फेक्शन झालं तरी कोव्हिड-19 हा आजार व्हायची शक्यता कमी.
अर्थात, मास्क वापरणं, अंतर ठेवणं, वृध्द आणि कोमॉर्बिडिटीज असलेल्या लोकांनी स्वतःच्या ऑक्सिजन पातळीकडे लक्ष ठेवणं आणि गरज वाटली तर तातडीने वैद्यकीय मदत घेणं आवश्यक आहे, हे सांगायला ते विसरले नाहीत.
एकंदर परिस्थिती पहाता कोरोनाची लस आलिय तरिही कोरोनाचा प्रादुर्भाव होतच आहे. त्यामुळे मलासुद्धा कोरोनाची लागण होऊ शकतो हे मी गृहीत धरलंच आहे. घराबाहेर पडताना मास्क घालणं, जमेल तेवढं लोकांपासून अंतर ठेवणं वगैरे गोष्टीसुद्धा मी करतोच.
पण घरी आल्यावर जसे स्वच्छ हातपाय धुतो तसंच गुळण्या करणं आणि जलनेती करायलाही मी सुरुवात केली आहे. त्यामुळे नाकावाटे आत गेलेले जीवजंतू काही प्रमाणात धुतले जातात.
आता कोरोनाचा विषाणू किती धुतला जाईल किती शिल्लक राहील, तो माझ्या शरीरावर काय परिणाम करेल, माझं काय होईल हे मला काहीच माहीत नाही. ते इन्फेक्शन झाल्यावरच कळेल!
पण प्राणायाम आणि जलनेतीमुळे माझं एकंदर आरोग्य सुधारायला मदत होईल याची मात्र मला खात्री आहे!
डॉ. धनंजय केळकरांच्या व्हीडिओजच्या लिंक्स खालीलप्रमाणे:
https://youtu.be/YysmD7IDuEg